सेंद्रीय खत
आपण या ब्लॉग मध्ये सेंद्रीय खत किंवा नैसर्गिक खत कसे बनवल्या जाते ते पाहणार आहोत.
सेंद्रिय खत म्हणजे काय?
सेंद्रिय खत हे नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केले जाते. यामध्ये गायीचे शेण, मूत्र, गुळ, विविध धान्यांचे पीठ, व सेंद्रिय पदार्थांचा वापर केला जातो. या घटकांमध्ये नैसर्गिक पोषक तत्त्वे असतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता आणि पिकांची गुणवत्ता वाढते. हे आपण सविस्तर रीतीने पाहणार आहोत.
सेंद्रिय खत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- हे मिश्रण प्रती एकर नुसार वापरावे
- 10 किलो शेण
- 10 लिटर गोमूत्र
- 1 किलो गूळ
- १ किलो पीठ
- १ किलो माती ( पिंपळ किंवा वडाच्या झाडाच्या खालची माती)
शेण आणि मूत्र
शेण आणि मूत्र हे देशी गाईच असेल तर खूपच चांगलं, जर नसेल तर तुम्ही त्यात काही प्रमाणात बैल किंवा म्हैसच घेऊ शकता, पण देशी गाईच काही प्रमाणात असणे गरजेचे आहे. कारण त्यात खूप जास्त प्रमाणात महत्त्वाचे सूक्ष्मजीव असतात. ते आपण त्यात टाकले तर ते त्यांचे गुण दाखवतात. ज्या जनावराचे शेण आहे त्याचेच मूत्र घ्यावे. जेवढ जुन गौमुत्र असेल तेवढं उपयोगीकारी असतं, ते कालबाह्य (एक्सपायर) होत नाही.
गूळ
गूळ हा गावरान असावा म्हणजे नैसर्गिक रितीने बनवलेला असावा. जुना किंवा खराब झालेला गूळ असला तर खूपच चांगलं. काळा पडलेला पण चालतो.
पीठ
कोणत्याही पिकाचे पीठ वापरायला हरकत नाही. जसे की मूंग, उडीद, हरबरा, सोयाबीन व इतर.
माती
वड व पिंपळाच्या झाडाखाली, जी माती असते त्यात खूप महत्त्वाचे सूक्ष्मजीव असतात. कारण इथे सतत नैसर्गिक वातावरण असते आणि २४ तास ऑक्सिजन असतो.
नैसर्गिक ( सेंद्रिय ) खत प्रक्रिया
वर दिलेली सामग्री एकत्र करा. जर कोरडे होत असेल तर त्यात थोड पाणी टाकावं. पाणी अस टाकावं की ते पंधरा दिवसांनी ओल राहील पाहिजे ( जर गरज असेल तरच ). त्याच व्यवस्थित रीत्याने मिश्रण करावे. मिश्रण झाल्यावर त्याला सावलीत (जसे की झाडाच्या सावलीत ) पंधरा दिवसांसाठी ठेवावं. त्यावर उन आल नाही पाहिजे ( थंड ठिकाणी ठेवावं ).
पंधरा दिवसांनी तुम्ही त्या मिश्रणात १० वेळा पाणी टाकून घ्या ( जसे की मिश्रण ३० लिटर असेल तर ३०० लिटर पाणी टाकावं , ४० असेल तर ४०० , ५० असेल तर ५०० लिटर या प्रमाणे). आता तुमचे सेंद्रिय खत तयार झाले आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता.
खत टाकण्याची वेळ
शेत तयार झाल्यावर टाकावं किंवा पेरणी करण्याच्या दोन तीन दिवस आधी टाकावं. नंतर सलग २१ – २१ दिवसांनी टाकत राहावं जो पर्यंत पिकाची कालावधी आहे तो पर्यंत.
पीक जर पाच महिन्याचे असले तर ७ वेळा टाकावं.
४ महिन्याचे असले तर ५ किंवा ६ वेळा टाकावं.
३ महिन्याचे असले तर ४ वेळा टाकावं.
२ महिन्याचे असले तर ३ वेळा टाकावं.
१ महिन्याचे असले तर १ किंवा २ वेळा टाकावं ( भाजीपाला ).
या प्रमाणे टाकावं
शेतात सेंद्रिय खत टाकण्याचे उपाय
- शेतात फवारून द्या.
- शेतात पाणी लावल्यावर त्यात थोड थोड प्रमाणात सोडून द्या. कॅनला तोटी लावून हळू हळू सोडू शकता.
- जुनं शेणखत असेल तर ते १५ दिवसांनी तयार झालेले सेंद्रिय खताबरोबर कालून लाडू तयार करून शेतात फेकून द्या.
- जळलेली गवरीची राख त्यात मिसळून लाडू बनवून शेतात टाकावं. ( गवारीच्या राखेत अधिक कलिसियम असतं )
फायदे
आपण बनवलेल्या नैसर्गिक खतामध्ये कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, सल्फर, सिलिकॉन, कोबाल्ट, मॅग्नेशियम, मॅग्नेशियम असे 18 सूक्ष्म पोषक तत्वे आहे, जे पिकांसाठी उपयुक्त आहे.तसेच गुळामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम जबरदस्त प्रमाणात असते.
या खतापासून एक नैसर्गिक वातावरण तयार होईल ज्यापासून वेगवेगळे प्रकारचे आवश्यक सूक्ष्मजीव आणि जिवाणू तयार होते ते पिकांसाठी उपयुक्त असेल.
जसे की आपण यामध्ये गुळाचा वापर करत आहे तर गुळापासून जे सूक्ष्मजीव वाढण्याचे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात होते त्याचे प्रमाण वाढते त्यामुळे आपण यात गोड वस्तू वापरतो तसेच तुम्ही या जागेवर गोड फळाचा रस पण वापरू शकता.
चेतावणी
नैसर्गिक खत वापरत असताना रासायनिक खताचा वापर करू नये. कारण आपण हे जे खत बनवत आहे, यामध्ये सूक्ष्मजीव आहे आणि जर तुम्ही रासायनिक खत वापरले तर ते सूक्ष्मजीव मरून जाईल. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला दिसून येणार नाही आणि तुम्हीच नंतर म्हणाल की या खताचा काही फायदा झाला नाही. त्याचे कारण हेच राहणार की तुम्ही रासायनिक खत टाकल्यावर सूक्ष्मजीव मरून जाणार.
स्रोत
एक महान भारतीय माणूस, राजू दिक्षित यांनी भरपूर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती बद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वदेशीला खूप महत्त्व दिल आहे. त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक तसेच छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून नैसर्गिक शेतीचे फायदे सांगितले.
त्यांच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला रासायनिक शेतीपेक्षा जास्त प्रमाणात उत्पन्न होईल फक्त एक – दोन वर्ष हे उत्पन्न कमी राहणार. कारण की तुम्ही अगोदर तुमच्या शेतीमध्ये रासायनिक खत वापरलेले असते आणि त्याला तुम्हाला पुन्हा नैसर्गिक शेतीमध्ये बदल करण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यासाठी पहिल्या वर्षी तुमचं उत्पन्न कमी होईल आणि नंतर ते दोन किंवा तीन वर्षांनी भरभरीत होईल आणि हे रासायनिक शेतीपेक्षा जास्त राहील. आणि खर्च पण झिरो असेल कारण या सर्व गोष्टी आपल्याला शेतीतूनच मिळते.
निष्कर्ष
तुम्हाला हे सेंद्रिय/नैसर्गिक खत वापरून फायदा झाला असेल तर इतरांना पण सांगा आणि कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता तुमचा अनुभव. तसेच तुम्हाला नैसर्गिक शेती बद्दल आणखी ब्लॉक बघायचे असेल तर खाली ब्लॉक आहे आणि जर का तुम्हाला नवीन विषयावर ब्लॉक पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा आम्ही तो नक्की बनवण्याचा प्रयत्न करू.